आम्ही प्रकाशबीजे
amhi prakash bije amhi prakashbije प्रकशबीजे प्रकाश प्रकाशबीजे
आम्ही प्रकाशबीजे, रुजवीत चाललोवाटा नव्या युगाच्या, रूळवित चाललो II धृ II
काट्यावरून जाता, मागे न पाय घेऊ
हसऱ्या कळ्याफुलांची स्वप्ने विणून घेऊओसाड माळ आम्ही फुलवीत चाललोवाटा नव्या युगाच्या रूळवित चाललो.आम्ही प्रकाशबीजे… II १ II
आमुची सुखे निराळी विश्वात बिंबलेलीदुःखात निर्मितीची स्फूर्ती उफाळलेलीआमुचे भविष्य आम्ही घडवीत चाललोवाटा नव्या युगाच्या रूळवित चाललो.आम्ही प्रकाशबीजे… II २ II
आले अपयश घाले पाया नव्या यशाचा
इतिहास साक्ष आहे आमुच्या पराक्रमाचा
प्रासाद सज्जनांचे सजवीत चाललो
वाटा नव्या युगाच्या रूळवित चाललो.
आम्ही प्रकाशबीजे… II ३ II
बदलार्थ वेचिती जे सर्वस्वही स्वतःचे
ते शिल्पकार सारे येत्या नव्या युगाचे
त्यांची स्मृती मनाशी जागवीत चाललो
वाटा नव्या युगाच्या रूळवित चाललो
आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो.
आम्ही प्रकाशबीजे… II ४ II