आनंदाने नांदत होते हिन्दू मुसलमान

Anandane Nandat Hote Hindu Musalman - Vamandada kardak waman dada kardak

शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण
आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान..

काळ्याराती तळपत होतं जिच्या रूपाचं ऊन,
अशी देखणी होती एका मुसलमानाची सून,
त्या तरूणीला आई म्हणाला राजा तो शीलवान,
आनंदाने नांदत होते..

आरमार प्रमुख केला दर्यासारंग दौलतखान
संत हो याकूतबाबा त्यांना जमीन केली दान
शिवबासाठी हिलालची झाली पाच पोरं कुर्बान
आनंदाने नांदत होते..

स्वराज्यावरी चालून आला ठार केला हो खान
मृत्यूनंतर वैर संपलं केली कबर निर्माण
दिवाबत्ती लावा कबरीला दिलं हो फरमान
आनंदाने नांदत होते..

~ महाकवी वामनदादा कर्डक

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle