भारताचा प्राण आहे संविधान
bhartacha praan ahe samvidhan
भारताचा प्राण आहे संविधान
भारताचा प्राण आहे संविधान
तयाला जाणून घेई घेई
तयाला जाणता जाणशी स्वतःला
तव अस्तित्वाला अर्थ येई
होते येथे सारे वेगवेगळे मी
आता झालो आम्ही भारतीय
देश ना राजाचा ना एका धर्माचा
आता हा सर्वांचा सर्वांसाठी
स्वामी म्हणे याची नका करू पूजा
सांगा एकादुजा अर्थ याचा