देह देवाचे मंदीर
deh devache mandir
देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर।
आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर ॥
जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर ।
जसे दुग्धा मध्ये लोनी, तसा देही चक्रपाणी ॥
देव देहात देहात, का हो जाता देवलात ।
तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना ॥