जे का रंजले गांजले
je ka ranjale ranjle ganjale ganjle
जे का रंजले गांजले | त्यांसी म्हणे जो आपुले ||
तोचि साधू ओळखावा | देव तेथेचि जाणावा ||
मृदु सबाह्य नवनीत | तैसे सज्जनाचे चित्त ||
ज्यासि अपंगिता नाही | त्यासी धरी जो हृदयी ||
दया करणे जे पुत्रासी | तेचि दासा आणि दासी ||
तुका म्हणे सांगू किती | तोचि भगवंताची मूर्ती ||