जिजाऊ वंदना
जिजा माउली गे, तुला वंदना ही ।
तुझ्या प्रेरणेने , दिशा मुक्त दाही ।।
भयातून मुक्ती , मिळाली जनांना ।
गुलामी कुणाला, कुणाचीच नाही ।।
नसे दु:ख कोन , नसे न्यून कोणा ।
फुलांना मुलांना , नसे दैन्य काही ।।
जिजा माउली गे...
जशी पार्वती ती, प्रिया शंकरास ।
तशी प्रेरिका गे , शहाजींस तुही ।।
जसा संविभागी, बळी पूर्वकाळी ।
शिवाजी जणांच्या, तसे चित्त देही ।।
जिजा माउली गे….
तुझ्या संस्कृतीने ,तुझ्या जागृतीने ।
प्रकाशात न्हाती , मने हि प्रवाही ।।
तुला वंदिताना, सुखी अंग अंग ।
खरा धर्म आता ,शिवाचाच पाही ।।
जिजा माउली गे...