नको ग माय जल्दी लगीन करू नको

nako g maay jaldi lagin karun nako

नको ग माय जल्दी लगीन करू नको
नको र बाबा जल्दी लगीन करू नको
बला म्हणू नको माझी चिंता करू नको
नको ग....

पिढ्यान पिढ्या माय बापानं वनवास भोगिला
राब राबुनी घाम गाळुनी शिकविलं हो मला
नाही अबला शिकून माये दावीन मी जगाला
पंख छाटू नको पिंजऱ्यात ठेऊ नको नको रं

चंद्रपूरला दर वारीला जाते ग माझी माय
नवस केला देव पूजिला मिळालं तुला काय
पोटाला तुझा रोटी मिळना वनवास केला माय
संधी दवडू नको माझी स्वप्न मोडू नको
नको ग

जोती सावित्री जन्माला आले शिक्षण केले खुले
महिला आणि दलितांच्या पंखाला बळ मिळाले
शिकण्यासाठी लढणासाठी घटनेत हक्क मिळाले
शिकू दे ग माय जग कळू दे ग माय

नको ग......

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle