ओवी संविधानाची
ovi samvidhanachi
बाई संविधान जाणते बाई संविधान बोलते
संविधान ऐकाया तू ये रे बा विठ्ठला
संविधान वाचीले, हक्क, हक्क वेचीले
संविधान वाचीले, हक्क, हक्क वेचीले
माळ त्याची कराया तू ये रे बा विठ्ठला (कोरस)
ओटी भरली समतेनं, ओटी भरली न्यायानं ओटी भरली समतेनं, ओटी भरली न्यायानं (कोरस)
स्वतंत्र बाई बघाया, तू ये रे बा विठ्ठला
ईडापीडा टळली, पिळवणूक जळली
ईडापीडा टळली, पिळवणूक जळली
कळसातून बघाया तू ये रे बा विठ्ठला
तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला (कोरस)
तू ये रे बा विठ्ठला, तू संविधान ऐकाया
(सर्वांनी मिळून दोन वेळा)
घरदार लाभले, दासीपण सुटले
घरदार लाभले, दासीपण सुटले
सात-बारा बघाया तू ये रे बा विठ्ठला
गावही चालवते, देशही चालवते
गावही चालवते, देशही चालवते
हक्काच्या वारीला तू ये रे बा विठ्ठला
संविधान जाणते, बाई संविधान बोलते (सर्वांनी मिळून)
संविधान जाणते, बाई संविधान बोलते (सर्वांनी मिळून)
संविधान ऐकाया तू ये रे बा विठ्ठला
(सर्वांनी मिळून दोन वेळा)
तू ये रे बा विठ्ठला, तू संविधान ऐकाया
(सर्वांनी मिळून दोन वेळा)