पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी
Padu chala re bhint
पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी
या मनामनातून बांधूया एक वाट जाणारी
सांधुया तो पुल जोडू प्रिती त्यावरी
या मनामणातून...
मी कोण, कोण तू आहे
कोणाला हे कळले आहे
विसरू हे मतभेद नको होऊ अविचारी
या मणामनातून...
हा हिंदू, मुस्लिम तू रे
भेद कसा हा मानव सारे
जातीसवा धर्मापरी ही मानवता प्यारी
या मनामानातून....
तुफान वादळे भवती
दर्यावरती लाटा येती
एकीत रे मग चालवू ही नाव तरणारी
या मानामनातून....