पोवाडा: शिवाजी महाराज यांचे शेती धोरण
Powada shivaji maharaj sheti dhoran
वतनदार ते रयतेवरती करीत होते मनमानी
फौजफाटा, गडकोट राखती, शेतसारा वर लादुनी....
औतकाठी अन बी-बियाणे, रयतेसाठी पुरविली
दुष्काळाच्या संकटकाळी, करमाफी हो राबवली
वतनदाराचे सैन्य उभ्या पिकाला तुडवी
बांधाबांधानं सैन्य चालं ही रीत नवी घडवी
राजा रं जी जी, शिवबा रं जी जी
राजा रं जी जी, हे हे हे हे हे हे
स्वराज्याकामी गरज तुम्हां जर लाकूडफाट्याची
घ्या राजी करुन अन किंमत देऊन, आज्ञा शिवबाची
राजा रं जी जी, शिवबा रं जी जी
राजा रं जी जी, हे हे हे हे हे हे
पोटच्या पोटापरी घेतली काळजी पिकांची ( भाजी ती काय? )
देठालाही शिवू नका ही आज्ञा शिवबाची..
राजा रं जी जी, शिवबा रं जी जी
राजा रं जी जी, हे हे हे हे हे हे
करु पहिलं नमन जोतिबाला….हा हा हा......
करु पहिलं नमन जोतिबाला, क्रांतीसूर्याला, त्यांच्या कार्याला
शिवबाच्या शोधलं समाधीला
शिवबावं पवाडा त्यांनी रचिला
कुळवाडीभूषण म्हटलं शिवाजीला
सुरू केलं हो शिवजयंतीला जी जी जी जी जी जी...
(जयघोष) महात्मा फुले शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणतात....
शेतकर्यां चा राजा पहिला, ऐषोरामाला नाही भुलला
थांबवला वतनदारांचा मार, प्रजेचं मिळवलं प्रेम अपार - आ...आलाप
मंदीर मशिदीला करी दान तो, घेई आशीर्वाद संतांचा तो
रयतेचं सुख त्याचं सुख होतं, बनवत होता कायदा नवा
मावळे गडी सोबतीला, शिपाई केले सर्व जातीला - आ...आलाप
युक्तीने वाचवी जिवाला तो, भिईना कधी संकटाला तो
शिवाजी राजा कुळभूषण...
जराही मिळे नाही दूषण...
असे म्हणे जोतिबा फुले शब्द ना मिळे.....जी..र...हा..जी..जी...जी...जी