विश्वव्यापी जनगणा

vishvavyapi janagana vishvavyapi janagana vishvavyApI janagaNA | विश्वव्यापी जनगणा

विश्वव्यापी जनगणा विश्वव्यापी जनगणा
तुज करूनी वंदना
गातो शाहिरी कवना
चाल तमाशा नमूनी आरंभिला जी
करू आम्ही सेवा हो करू आम्ही सेवा
आशीर्वाद द्यावे आम्हाला दाजी, दाजी हे...
ज्याने केली तुझी भक्ती, ज्याने केली तुझी भक्ती
झाली अजरामर कीर्ती, राजा शिव छत्रपती
टिळक, महात्मा फुले ज्योती, आंबेडकर आले उदयाला जी
उदयाला हो आले उदयाला, पारतंत्र्य गेले विलयालाग्नदाजी, दाजी हे...
आम्ही कलेचे हो दास, आम्ही कलेचे हो दास
साधू देशाचा विकास, करू अज्ञानाचा नाश
हीच मनी घेतो आस, वाहूनी कला कार्याला जी
अण्णाभाऊ साठे हो बापूराव साठे भूषवी लोकनाटयाला दाजी, दाजी हे...

  • शाहीर अण्णाभाऊ साठे

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle