तोड मर्दा, तोड ही चाकोरी

toda marda, toda hi chakori toda marda, toda hi chakori toDa mardA, toDa hI chAkorI | तोड मर्दा, तोड ही चाकोरी

तोड मर्दा, तोड ही चाकोरी
तोड बाई, तोड ही चाकोरी
तोड तोड तोड तोड, तोड ही चाकोरी
मुक्तीचं गीत म्हणा, रात हाय अंधारी
गावापासून आपल्या शहरापातूर
बायांपासून आपल्या पोरापातूर
सर्वांना मातीशी इमान हाय रं
तरी बी चूल का गुमान हाय रं...
कुणाची शेतं आनं कुणाची भातं
आपण जात्यात तर ते हसत्यात सुपातं
सुपातल जात्यातं जाणार हाय रं
इतिहास खोटं कधी बोलणार न्हाय रं...
सूर्याचा परकास सर्वा समान रं
धरणीच्या पोटातलं पाणी समान रं
फिरणारा वारा सर्वा समान हाय रं
जमीन का सर्वांना समान नाय रं...
दिल्लीच्या वाटला कुपान हाय रं
संसद नावाचं एक दुकान हाय रं
स्वातंत्र्य स्वातंत्र्य कशात हाय रं
रोटी मागल त्याला बंदूक हाय रं...
पिढयानं पिढयांच वझं पाठनी
आजवर गायली आम्ही आसवांची गाणी
सुखाचं गाणं गडया फुलणार हाय रं
रातीत मशाल पेटवायची हाय रं
आजच मशाल पेटवायची हाय रं
आताच मशाल पेटवायची हाय रं.... - संभाजी भगत

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle