शिकणाऱ्या भावा रं

shikanarya bhava ram shikanarya bhava ram shikaNARyA bhAvA raM | शिकणाऱ्या भावा रं

शिकणाऱ्या भावा रं, लिवनाऱ्या भावा रं
वाचणाऱ्या भावा रं, रडणाऱ्या भावा रं
शेताच्या बांधावरनं, मी हाक तुला देतोय
जंगलाच्या गर्भामधनं, मी हाक तुला देतोय
मी शेतमजूर बोलतोय, मी आदिवासी बोलतोय
यंत्राच्या चक्रामधनं, मी कामगार बोलतोय
तुझी माझी एकी घडू दे, शेत माझं हसतं फुलू दे
जंगलामधली पाखरं उडू दे, अन्यायाचं मूळ तुट़़ू दे, हा!
सूर्याची वाट बघतोय, क्रांतीच सपानं बघतोय
कॉलेजची बिल्डिंग तुझ्या, लयी मोठी हाय म्हनत्यात
तू वाचतो ती रं बुकं, लयी मोठी हाय म्हनत्यात
तू बसतो ती रं बाकं, लय भारी हाय म्हनत्यात
अरं बिल्डिंगीच्या थोडीमध्ये, पुस्तकांच्या घडीमध्ये,
बाकांच्या फटीमध्ये, हा!
लयी पिढया त्यात गेल्या, नायी पुस्तकात लिवल्या
तू कशासाठी शिकतोय, नोकरीसाठी शिकतोय
तू कशासाठी शिकतोय, भल्या जीवनासाठी शिकतोय
तू कशासाठी शिकतोय, माणूस बनण्यासाठी शिकतोय
नोकरी नाही, सुख नाही, चैन नाही, माणूस नाही, हा!
एवढी मोठी डिग्री रं, ती काय कामाची रं
लय सुखी देश आहे, तुझ्या पुस्तकात लिवलयं
स्वतंत्र देश आहे, तुझ्या पुस्तकात लिवलयं
स्वयंपूर्ण देश आहे, तुझ्या पुस्तकात लिवलयंग्न
सम्राटांच्या पंजामध्ये, धर्मांधांच्या जबडयामध्ये,
शहराच्या बाजारामध्ये, हा!
तू गहाण पडला रं, नाही पुस्तकात लिवला रं
संप, मोर्चा बघू नको, हे शिक्षण तुला सांगतय
गरिबीकडं बघू नको, हे शिक्षण तुला सांगतय
झोपडयाकडं बघू नको, हे शिक्षण तुला सांगतय
ते घाण लई असतंय, हे शिक्षण तुला सांगतय
अरे संप नको, मोर्चा नको, गरीब नको, गुरीब नको
झोपडया नको, घाण नको, हा!
तुला भेकड बनवतय, शिक्षण लाचार बनवतय
मी जंगलामध्ये लढतोय, तुला बातमी नसलं कळली
मी शेत मागाया उठलोय, तुझी नजर नसलं वळली
मी फॅक्टरी मागाया उठलोय, आता मूठ माझी वळली
सोडं पेन, उचल घण, घडव मन, माजलं रण, हा!
लय वाट तुझी बघतोय, मी वाट तुझी बघतोय
सूर्याची वाट बघतोय, क्रांतीच सपानं बघतोय

Read more

एआयचे वस्तूपूजकत्व

एआयचे वस्तूपूजकत्व

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle
जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

मुख्य न्यायाधीशांच्या ‘कॉकरोच’ टिप्पणीपासून सुरू झालेली कॉकरोच जनता पक्षाची व्यंग्यात्मक चळवळ काही दिवसांतच कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली. या घडामोडींनी तरुणांमधील असंतोष, प्रसारमाध्यम स्वातंत्र्यावरील चिंता आणि भारतातील बदलत्या डिजिटल राजकारणाकडे लक्ष वेधले.

By Shubham Halle