दौलतीच्या राजा उठून सर्जा
daulatichya raja uthuna sarja daulatichya raja uthuna sarja daulatIchyA rAjA uThUna sarjA | दौलतीच्या राजा उठून सर्जा
दौलतीच्या राजा उठून सर्जा
हाक दे शेजाऱ्याला रं, शिवारी चला
संदी लई नामी आलिया अवंदा
सावकारशाहीचा विखारी कुंदा
आरपार खुरपून पाडायचा रेंदा
दाखवाया बळा, उचलं घे इळा
पोलादी पाजळून आपला रं, शिवारी चला
भांडवलशाहीचा चिवट कणा
वर वर छाटलाय तरी बी जाईना
अन् जराशी बी शेती पिकू देईना
उपट़ून मुळी, घाल पायदळी
तुडवून आला गेला रं, शिवारी चला
साम्राज्यशाहीची माकडं काळी
हातातला घास नीट खाऊ न देती
ध्या दिसा लुटल्यात रं आंबराई
एकजूट करून, नीट नेम धरून
आखरीच्या माराया टोला रं, शिवारी चला
रातदिस राबून साल न् साल
किती पिढया आम्ही काढायचं हाल
रोखू आता बांधावर बावटा लाल
काळावर चाल कर, हत्यार नीट धर
एकीचा बांधुनी किल्ला रं, शिवारी चला