हाडांची काडं करून

hadamchi kadam karuna hadamchi kadam karuna hADAMchI kADaM karUna | हाडांची काडं करून

हाडांची काडं करून काढला खाणीतून कोळसा
खोकून आमचा जीव गेला नि भरला तुझा खिसा
तवा बदमाशा कळला नव्हता का धरम आमुचा
हो दादा रं, तवा तू कसं इचारल नाय,
की आमची जात कंची हाय, न् आमचा धरम कंचा हाय
उपाशी पोटी जेव्हा फिरवला तुझा नांगर
भाजून उन्हात काढली तुझ्या पिकांची रास
तवा बदमाशा कळली नव्हती का आमची जमात, हो दादा रं...
चिखलातून आम्ही मडक बनवलं, पाणी प्यालास
वाहून ढोरं बांधल्या चपाला, वहाणा घातल्यास
तवा बदमाशा कसा नाही रं, तू बाटलास, हो दादा रं...
बांधल तुझं घर लावूनी इटेवर इट
करून हमाली तुझ्यासाठी रं, मोडली आमची पाठ
तवा बदमाशा कळली नव्हती का आमची जमात, हो दादा रं...
बनवला कागद आम्ही, त्यावर तू धर्मग्रंथ लिवला
विणली फुलांची परडी आम्ही अन् देव तूच पुजला
अस्पृश्यांची परडी वापरून देव नाही बाटला का? हो दादा रं...
मातीत घाम गाळल्या शिवाय पीकं येत नाही
कष्ट केल्याशिवाय जगात काहीच मिळत नाही
आमचे कष्ट नि आमच्या घामाला जात धर्म नाही का? हो दादा रं...
कळला खोटेपणा आता, तुझं फुटलंया बिंग
उर्मट़ तुझ्या भेदभावाला लावीन सुरुंग
जात जमात, धर्म, सर्व होतील एकसंघ, तवा दादा रं..
यारं श्रमिका, यारं दलिता, हाती घेऊन हत्यार
अत्याचारा निपट़ून काढण्या व्हा आता तैय्यार
तेव्हा त्याला खरा दाखवू की, आमची जात कंची हाय...

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle