उठाव झेंडा बंडाचा
uthava jhemda bamdacha uthava jhemda bamdacha uThAva jheMDA baMDAchA | उठाव झेंडा बंडाचा
उठाव झेंडा बंडाचा, झेंडा आपुल्या रक्ताचा
कामगार स्वातंत्र्याचा, शेतकरी स्वातंत्र्याचा
लाल, लाल, लाल, झेंडा क्रांतीचा, उठाव...
पिऊनी पिऊनी हे रक्त आपुले
फार माजली भांडवलशाही
उखडून द्याया तिला एकदम
सुरू करा मोहीम आपुली, उठाव...
भूक भूक आरोळी ठोकूनी
कामगार संपावर जाती
शांत तयांना करण्यासाठी
गोळ्या चारी भांडवलशाही, उठाव...
पाठीवरती पोट बांधुनी
कितीक फिरती कामासाठी
पोरे बेकारांची मरती
मरोत भांडवलवाले म्हणती, उठाव...
आता मागे हटणे नाही
तहनाम्याच्या बाता नाही
पुढेच घुसणे ठरली नीती
आपुली एकी अंतिम शक्ती, उठाव...