भल्लरी म्हणा रं

bhallari mhana ram bhallari mhana ram bhallarI mhaNA raM | भल्लरी म्हणा रं

भल्लरी म्हणा रं, धरा सुरात ठेका
शिवार राखाया, अशी गोफण फेका
घढीत कोल्हा कुई कुई करतोय
नजर चुकवून पिकात शिरतोय
दगाड उचला, जागीच कुचला, नेम धरून ठोका...
कष्टाची खात्री पटली तशी जमीन काळी नटली
जशी शेताला उभारी फुटली मान उचलून जवारी उठली
बाजुच्या गावात आवई उठली
टोळधाड लय मोकाट सुटली
काठया बनाटचा घ्या मोठया मोठया, चोर चिलट रोखा...
लय बेतं महाग झालं, किती पैसं त्यातच गेलं
पर कष्ट फळाला आलं, पावसानं उपकार केलं
भुईमुग हुलगा मटकी तुरी
सुकवून उचलून न्यायच्या घरी
गुरगुर फुटफुर करीत टपून बसलाय रान बोका...
कणसाची मळणी करू, दानं उपवून पोत्यात भरू
कुनी जूपा रं गाडी बैल, लांब जायाचं पंधरा मैल
दलाल भडवा येईल आडवा
आपला शिमगा त्याचाच पाडवा
एकीनं त्याच्या कारस्थानाचं काळं पानी जोखा...
आता सुगीचं दिवस सरलं, उजवायचंय पोरगं थोरलं
त्यात माझं बी धोतर इरलं, बायकुचं गहाण डोरलं
सावकार करतोय भामटेगिरी
संघटना पाळा, त्याला पिटाळा, सोडू नका मोका...
विलास घोगरे

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle