पिक्चरला चल गं रंगू

pikcharala chala gam ramgu pikcharala chala gam ramgu pikcharalA chala gaM raMgU | पिक्चरला चल गं रंगू

तो: पिक्चरला चल गं रंगू रंग दाखवतो
रंग दाखवतो गं तुला ढंग दाखवतो
एका एका ॲक्टरचा डिस्को दाखवतो
डिस्को दाखवतो गं तुला डान्स दाखवतो
तो: आमिताभ बच्चन माझा लाडका गं हिरो
पडद्यावर म्हणतो कसा मारो तोडो मारो
वीस पंचवीस गुंडांची चटणी बनवतो
तीन तास स्वत:ला मी हिरोच समजतो
ती: पडद्यावरचा आमिताभ झोपड्यात आला
गल्लीतल्या पोरांसंग राडाच झाला
शेजारचा बाळ्या कसा रट्टा लावतो
आमिताभ बच्चनला हनुमान बनवतो
तो: पडद्यावरची हिरॉईन बागेत भेटते
काश्मिरात नटते ती गोव्यात थटते
वरळीच्या सीफेसवर उड्या मारते
एकाच गाण्यामधी होल इंडिया घ्ñुमवते
ती: पिक्चरची हिरॉईन महालाची राणी
येते का भरायला नदीवर पाणी
लाडाला आला माझा नवरोबा पांड्या
दिमागात भरल्या याच्या चार किलो भेंड्या
कुबेरांची सुखदु:ख कुबेरांची गाणी
सांग कधी दाखवली का आपुली कहाणी
त्यांची दुनिया वेगळी रं आपली दुनिया वेगळी
नाही कळली तुला माझी प्रीत आगळी
तो: काय बघा पदरात पडलीया बायकू
रोज उठून सांगा हिचं ग्यान किती ऐकू
पगाराचा दिवस म्हनलं मारू थोडी मज्जा
तू होशील राणी मी होईन तुझा राजा
चल गं रंगू बाल्कनीची टिकटं काढतो
इंटरवल झाल्यावरं वडा चारतो
ती: तुझा काही दोष नाही कसलाच राया
डोक्यातं भूतं तुझ्या सिनेमाची माया
होऊ नये जाण तुला तुझ्या गरिबीची
मालदारांनी काढली आयडिया टी.व्ही. सिनेमाची
झोपड्यात आपल्या कुणी अंधार माजवला
सांग कुणी विचाराचा दिवा विझवला
तो: चल चल ती: नको रे नको
तो: चल चल ती: नको रे नको...

  • संभाजी भगत

Read more

एआयचे वस्तूपूजकत्व

एआयचे वस्तूपूजकत्व

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle
जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

मुख्य न्यायाधीशांच्या ‘कॉकरोच’ टिप्पणीपासून सुरू झालेली कॉकरोच जनता पक्षाची व्यंग्यात्मक चळवळ काही दिवसांतच कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली. या घडामोडींनी तरुणांमधील असंतोष, प्रसारमाध्यम स्वातंत्र्यावरील चिंता आणि भारतातील बदलत्या डिजिटल राजकारणाकडे लक्ष वेधले.

By Shubham Halle