भीमवंदना

bhimavamdana bhimavamdana bhImavaMdanA | भीमवंदना

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना
दुमदुमे ' जयभीम ' ची
गर्जना चोहीकडे
सारखा जावे तिथे
हा तुझा डंका झडे
घे आता घे राहिलेल्या संगरांची वंदना, आज घे...
कोणते आकाश हे
तू आम्हा नेले कुठे
तू दिलेले पंख हे
पिंजरे गेले कुठे
या भराऱ्या आमुच्या, ही पाखरांची वंदना, आज घे...
कालचे सारे मुके
आज बोलू लागले
अन् तुझ्या सत्यासवे
शब्द तोलू लागले
हे वसंता, घे मनांच्या मोहरांची वंदना, आज घे...
एक आम्ही जाणतो
आमची तू माऊली
एवढे आहे खरे
आमुची तू सावली
घे आम्ही त्यांना दिलेल्या उत्तरांची वंदना, आज घे...
जाळले गेलो तरी
सोडले नाही तुला
कापले गेलो तरी
तोडले नाही तुला
ही तुला उध्वस्त झालेल्या घरांची वंदना, आज घे...
तू उभा सूर्यापरी
राहिली कोठे निशा
एवढे आम्हा कळे
ही तुझी आहे दिशा
मायबापा घे, उद्याच्या अंकुरांची वंदना, आज घे...
धम्मचक्राची तुझ्या
वाढवू आम्ही गती
हा तुझा झेंडा आम्ही
घेतलेला सोबती
ऐक येणाऱ्या युगांच्या आदरांची वंदना, आज घे...

  • सुरेश भट

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle