उठ माणसा उठ आता तू
utha manasa utha ata tu utha manasa utha ata tu uTha mANasA uTha AtA tU | उठ माणसा उठ आता तू
उठ माणसा, आता उठ माणसा
उठ माणसा उठ आता तू तोड जातीच्या बेडया
गुलामगिरीची उचलून तिरडी
मोडून काढ या खोडया, आता उठ...
कोण मराठा, महार, ब्राह्मण, हिन्दू, मुस्लिम, इसाई
मानव तितुका एकच की रे सगळे भाई भाई
मग पाण्याच्या थेंबाला का काटेरी कुंपण
थुंकी झेलण्याचे का माणसा बंधन
धर्म धुरंदर बिलंदरांचे झुगारून द्या दडपण, आता उठ...
इतिहासाचे रांजण भरले दलित अश्रुबिंदूनी
पिढयापिढयांचा मलीदा गिळला कर्मठ नटखट भोंदुंनी
अस्मितेचा सूर्य पेटला पेटवाया जाती
मोडून फोडून टाका तोडून या व्देषाच्या भिंती
भस्म करा ही युगायुगांची आंधळ्यांची शाळा, आता उठ...
या माणसाने त्या माणसाला परंपरेने लुटले रे
संस्कृतीने चिकटविलेले कलंक पेट़ून उठले
मग सावलीच्या स्पर्शाने संतप्त सनातन संस्कृती
मानव्य ठेचणाऱ्या या सोवळ्या विकृती
वेशीबाहेर दडणारा तो ज्वालामुखी पेटला, आता उठ...
- श्रीपाल सबनीस