पुढारी बघा निघाला दिल्लीला

pudhari bagha nighala dillila pudhari bagha nighala dillila puDhArI baghA nighAlA dillIlA | पुढारी बघा निघाला दिल्लीला

पुढारी बघा निघाला दिल्लीला
इसरून जाणार झोपड गल्लीला
पुढारी बघा निघाला दिल्लीला
खादीचा झब्बा घालून पुढारी, हात जोड़ुनी हो मत मागतो
निवडून येतो, साहेब होतो, मतदाराचा गळा घोटतो
झोपडपट्टीच्या दादा लोकांना, या पुढाऱ्यानं दारू पाजली
थप्पी मोजली, गुंड पोसली, दमदाटी देऊन मत मिळविली
तोडाया मोडाया झोपडपट्टीला, मंत्री होऊन कायदा काढतो
हुकूम सोडतो, पोलिस धाडतो, ज्यांनी निवडून दिलं त्याला
निवडणुकीमध्ये पैसं खर्चाया, शेट सावकारांचं कर्ज काढतो
महागाई वाढवून, फेडून टाकतो, काळ्या धंद्यांचं परवानं देतो
राशनच्या दुकानाम्होरं लायनीला, पुढारी कधी का उभा राहतो
किडकं धान्य, तुम्हा आम्हा चारतो, स्वत: मात्र दिल्लीराईस चाखतो
पाच वर्षांनी पुन्हा येणार, हात जोडुनी मतं मागणार
चमचे लोकांना, हाती घेणार, तुम्हा आम्हाला तोंडी लावणार
ताई, माई, दादा, इचार करावा, असलं मतदान बाजूला सारा
बहिष्कार पुकारा, द्या क्रांतीचा नारा, एक होउनी लढण्यास उभा रहा

  • विलास घोगरे

Read more

एआयचे वस्तूपूजकत्व

एआयचे वस्तूपूजकत्व

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle
जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

मुख्य न्यायाधीशांच्या ‘कॉकरोच’ टिप्पणीपासून सुरू झालेली कॉकरोच जनता पक्षाची व्यंग्यात्मक चळवळ काही दिवसांतच कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली. या घडामोडींनी तरुणांमधील असंतोष, प्रसारमाध्यम स्वातंत्र्यावरील चिंता आणि भारतातील बदलत्या डिजिटल राजकारणाकडे लक्ष वेधले.

By Shubham Halle