उचला पुढारी

uchala pudhari uchala pudhari uchalA puDhArI | उचला पुढारी

तुझ्या सत्तेला, सुरुंग मी लावणार माझ्या दिल्लीच्या, दिल्लीच्या कारभाऱ्या
माझ्या म्हंमयच्या, म्हंमयच्या कारभाऱ्या
तुझ्या नावाचा, उद्ध्दार मांडीला
तुला शंभरदा, निरोप धाडीला
का रं भुललासी, भुललासी इमल्याला
गेला इसरून, इसरून झोपडयांना
रूप दावून सत्ता केली, स्वारी पुढाऱ्याची येडी झाली
अन् सत्ताबाईचं याड लागलं, पुढारी अस्सं पुढारी
कोरस: येळकोट येळकोट उचला पुढारी
मतदानाच्या, दानाच्या टायमाला
होतो हाजीर, हाजीर भाषणाला
काय तोऱ्यात, तोऱ्यात बोलिला
तुझ्या निशाणीवर, शिक्का म्या मारिला
तुझा दिल्लीत, दरबार भरविला
तुझा म्हंमयत, दरबार भरविला
गाडी बसायला तुला मिळाली, तुला व्हिस्कीची नशा रं चढली
अन् सावकाराशी दोस्ती जडली, पुढारी अस्सं पुढारी
कोरस: येळकोट येळकोट उचला पुढारी
काय रुबाब, रुबाब वर्णावा
इस्त्री कडक, कडक झब्याला
गांधी टोपी रं, टोपी ही डोक्याला
जातो हॉटेलात, हॉटेलात पार्टीला
तुझ्या दारात, पाऊस पैक्याचा
ऐतं खाऊन, पोलीस पाहऱ्याला
तुझ्या पोलिसांना मस्ती जडली, त्यांनी गरिबांची घरं मोडली
अन् मोकळ सोडलं कुत्र्यांना अस्सं, पुढारी अस्सं पुढारी
कोरस: येळकोट येळकोट उचला पुढारी
तुझ्या पाहून, पाहून ढेरीला
आमची पोट रं, पोटं खपाटीला
कसं पाठवू रं, पोराला साळला
पोर जातो रं, गुरं राखायला
तुझा पोर पुढारी झाला, माझा पोर गुराखीच राह्यला
अन् लोकशाही का ठोकशाही ही, पुढारी अस्सं पुढारी
कोरस: येळकोट येळकोट उचला पुढारी
येळकोट येळकोट आपटा पुढारी
आता वैताग, वैताग भाषणांचा
निस्ता पाऊस, पोकळ वचनांचा

तुझ्या भावबंदाना, तुरुंगात मी धाडणार
जागर समतेचा, समतेचा घालणार
समतेचा जागर मांड़िला, जागराला या या
कष्टकऱ्यांनो, शेतकऱ्यांनो, जागराला या या
या गावामधल्या भावाबहिणींनो, जागराला या या
शाळेमधल्या पोराबाळांनो, जागराला या या
जागराला याऽऽ, तुम्ही जागराला या याऽऽ
समतेचा जागर मांडिला, जागराला या या
विषमतेचा तुरुंग फोडून, जागराला या या
विज्ञानाचा जागर मांडिला, जागराला या या
अंधश्रध्देचा तुरुंग फोडून, जागराला या या
जागराला याऽऽ तुम्ही जागराला या या

Read more

एआयचे वस्तूपूजकत्व

एआयचे वस्तूपूजकत्व

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle
जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

मुख्य न्यायाधीशांच्या ‘कॉकरोच’ टिप्पणीपासून सुरू झालेली कॉकरोच जनता पक्षाची व्यंग्यात्मक चळवळ काही दिवसांतच कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली. या घडामोडींनी तरुणांमधील असंतोष, प्रसारमाध्यम स्वातंत्र्यावरील चिंता आणि भारतातील बदलत्या डिजिटल राजकारणाकडे लक्ष वेधले.

By Shubham Halle