सर्व श्रमणाऱ्या महिलांनो

sarva shramanarya mahilamno sarva shramanarya mahilamno sarva shramaNARyA mahilAMno | सर्व श्रमणाऱ्या महिलांनो

सर्व श्रमणाऱ्या महिलांनो, घरी दारी राबणाऱ्यांनो
एक होऊ चला आता एक होऊ चला
गिरणीमध्ये वरीस वीस काम करून गंगू थकलीस
झाले तुझे केस पांढरे, मालकाचे अन् उखळ पांढरे
परी तुझ्या डोक्यावरी टांगे कुऱ्हाड ही बेकारी
बेकार बाया रस्तोरस्ती, पाटया घेऊन भाज्या विकती
काम द्या आम्हाला, काम द्या आम्हाला, एक होऊ चला...
कोठे चाललीस मिस मेरी, आज चालू का तुझी फॅक्टरी
तोंड आणि का इवले झाले, खुदकन कसले हासू आले
अस्से अस्से लग्न ठरले, म्हणून गाली गुलाब फुललेग्न
चेहरा का मग दीनवाणा, मालक मागे राजीनामा
पेच पडे मला, पेच पडे मला, एक होऊ चला...
पांढरी सफेद साडी नेसून कोण चालल्या या घाईनं
नर्सबाई ही तर आमची, माय माऊली ही रोग्यांची
आठ घंटे दिवसपाळी, बारा घंटे रात्रपाळी
कुट़ुंबासाठी खोली नाही, म्हणतात येऊन एकटी राही
काय करू बोला, काय करू बोला, एक होऊ चला...
मास्तरीन बाई येती दिसभरी बोलताती
बोल त्यांच्या मनचे परी, लक्ष देऊन ऐकू तरी
शिकविते शंभर पोरा, माझे तान्हे आहे घरा
मनीचे हे माझे शल्य, रुतून राही खोल खोल
कसे सांगू कोणाला, कसे सांगू कोणाला, एक होऊ चला...
पहाटेपासून सैपाक दळण, साफ करून गोठा अंगण
कासराभर दिन येता, शेतकरीन निघे शेता
दिवसभर निंदण खुरपण, संध्याकाळी सैपाका जुंपण
आवरून सावरून झोपी जाता, पोरीच्या लग्नाची चिंता
हे चाललंय सालोसाला, हे चाललंय सालोसाला, एक होऊ चला...
भागूबाई निघे सकाळी, डोईवर पाटी पाठीस झोळी
फार दिसांनी मिळे मजुरी, खपे न उशीर मालक मुजोरी
रुपया रोज उपाशी काम, परतताना वेचता सर्पण
डोळ्यापुढे व्याकुळ पोर, कुठून मिळंल पीठ उसनं
जीव जेरीस आला, जीव जेरीस आला, एक होऊ चला...
शेतीत, गिरणीत, कारखान्यात, ऑफिसात अन् शाळांत
इस्पितळे अन् बँकात किती भगिनी कष्ट करतात
कधी न सुटी ना आराम, सुटी दिवशी घरचे काम
गुलामी ही युगे शतक, भर नोकरीची ही त्यात
जीव थकून गेला, जीव थकून गेला, एक होऊ चला...
उठा आता सगळ्याजणी, उठा आता सगळ्याजणी
आपण साऱ्या एकवट़ुनी, आपण साऱ्या एकवट़ुनी
सांगू चला सरकारला, आता नाही आम्ही अबला
मागण्या या करा मान्य, खडे पहा आमुचे सैन्य
भाषा नको माघारीची, शपथ तुम्हाला गळ्याची

  • सुमन कात्रे (मेस्त्री)

Read more

एआयचे वस्तूपूजकत्व

एआयचे वस्तूपूजकत्व

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle
जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

मुख्य न्यायाधीशांच्या ‘कॉकरोच’ टिप्पणीपासून सुरू झालेली कॉकरोच जनता पक्षाची व्यंग्यात्मक चळवळ काही दिवसांतच कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली. या घडामोडींनी तरुणांमधील असंतोष, प्रसारमाध्यम स्वातंत्र्यावरील चिंता आणि भारतातील बदलत्या डिजिटल राजकारणाकडे लक्ष वेधले.

By Shubham Halle