वस्तीवस्तीच्या बायाबायांमध्ये

vastivastichya bayabayammadhye vastivastichya bayabayammadhye vastIvastIchyA bAyAbAyAMmadhye | वस्तीवस्तीच्या बायाबायांमध्ये

वस्तीवस्तीच्या बायाबायांमध्ये एकीची गरज हाय ग
मानसावानी जर जगायचं तर आज एकीची गरज हाय ग
आजवर भीत भीत जगलो आपुन
घरांच्या भिंतींना दुनिया मानून
इचार करून आता भायेर पडून
अन्यायाला दूर कराया जागं व्हायाची गरज हाय गं, मानसावानी...
कोणी म्हणेल बाईमाणूस तुम्ही
तुमच्या हातून काही होणार नाही
तुम्ही गुमान घरी बसत का न्हाई
गुमान ऱ्हाऊन आता भागायचं न्हाय हे बजावून सांगायचं हाय गं, मानसावानी...
कारखान्यात, शेतात, रस्त्यावरी
बायामुलींना त्रास भारी
जिथं तिथं होते गुंडगिरी
बायांची ताकद सारी एक झाली तर कुणाची टाप मग हाय गं, मानसावानी...
सारख्या कामाला नाही सारखा पगार
महागाईनं लई केलंय बेजार
न्हाय बाळंतरजा न्हाय पाळणाघर
एकीच्या जोरावर सारे हक्क आता मिळवून घ्यायाचे हाय गं, मानसावानी...
शहरातल्या बाया आता एक होऊ
दूरवर नजर मग टाकून पाहू
बहिणींना शेतावरल्या हाक देऊ
शहरातल्या खेडयातल्या बाया झाल्या एक तर कुणाची भीती मग हाय गं, मानसावानी...
एकजूट झाल्यावर धीट होऊ
पुरुषांच्या लढयाला साथ देऊ
लढा पुढे आणि घेऊन जाऊ
समदी ताकद आपली लाऊनशानी एकेक लढाई जिंकायची हाय गं, मानसावानी...

  • कल्पना जवळीकर

Read more

एआयचे वस्तूपूजकत्व

एआयचे वस्तूपूजकत्व

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle
जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

मुख्य न्यायाधीशांच्या ‘कॉकरोच’ टिप्पणीपासून सुरू झालेली कॉकरोच जनता पक्षाची व्यंग्यात्मक चळवळ काही दिवसांतच कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली. या घडामोडींनी तरुणांमधील असंतोष, प्रसारमाध्यम स्वातंत्र्यावरील चिंता आणि भारतातील बदलत्या डिजिटल राजकारणाकडे लक्ष वेधले.

By Shubham Halle