बाई माझ्या काचंच्या बरणीत
bai majhya kachamchya baranita bai majhya kachamchya baranita bAI mAjhyA kAchaMchyA baraNIta | बाई माझ्या काचंच्या बरणीत
बाई माझ्या काचंच्या बरणीत, ग बाई...
बाईला वतीली डबडयात, ग बाईला...
बाईला काटकीनं ढवळीली, ग बाईला...
बाईला कापसावर गाळली, ग बाईला...
बाईला वतीली गिल्लासात, ग बाईला...
बाईला लाविली ग तोंडाला , ग बाईला...
बाई माझी बोलती पोपटावानी, ग बाई...
बाई माझी लोळती गाढवावानी, ग बाई...
बाई माझी वागती येडयावानी, ग बाई...
बाई माझी फुकीते पैसा सारा, ग बाई...
बाईनं इस्कोट ग केला, बाई इस्कोट ग केला
अशी बाई लागली कीड संसारा, ग अशी...
बाई म्या काय मग ईचार केला, ग बाई...
बाया आम्ही एक एक झालो गोळा, ग बाया...
बाईला हिसका ग दाविला, ग बाईला...
बाईला हाकलून लाविली, ग बाईला...
अशी बया म्हसणात गाडिली, ग अशी...
अन् मी गालात हासली ग, बाई गालात हासली
(लोकगीतावरून)