चल ग हिरा चल ग मीरा

chala ga hira chala ga mira chala ga hira chala ga mira chala ga hirA chala ga mIrA | चल ग हिरा चल ग मीरा

चल ग हिरा चल ग मीरा चल ग बायजाबाई
मागं काही नाही आता तट़ून उभी राही, तट़ून उभी राही
दोन प्रहरचा दिवस आला, अन्यायाचा कळस झाला
पुरुषांच्या राज्यामध्ये बाई समान नाही, मागं काही नाही...
घरकामाचा बोजा आधी, मग मजुरी मळ्यामधी
तान्ह्या पोरा पाहायला माझं कुणी नाही, मागं काही नाही...
सावकाराचा तरास लई, दादला आधी बाटली पाही
समदा न्याय करायाला कंबर कसून राही, मागं काही नाही...
सहकारी साखर शेती, त्यातून दारू तयार होई
समाजाला गुंगी आली धर्माकर्मापायी, मागं काही नाही...
शिवारांत भुकी शेतं, नदीमधी पाणी कुठं
दुष्काळाचा फेरा आता सोसायाचा नाही, मागं काही नाही...
अर्धा दिवस कामाविना, वणवणतो उन्हातान्हा
बायापुरुष बेकार आता राहायचं नाही, मागं काही नाही...

  • माधव चव्हाण

ही आग चहु बाजूनं हो लागली संसारा
सवालाचा जबाब दे रं देशाच्या सरकारा

रात्रंदिसं राबून आम्ही झोपतो उपाशी
आईतखाऊ हा तिकडं फिरतो परदेशी
अडाणीला मलिदा आणि जनतेला धतुराचा
सवालाचा जबाब देर भाजपा सरकारा

सोन्याची किंमत आली गोड्या र तेलाला
महागाईने कहर केला जनतेच्या खिशाला
घासलेटावाचून अंधार सोईरा
सवालाचा जबाब देर भाजपा सरकारा

रात्रंदिस राबून, आम्ही झोपतो उपाशी
आईतखाऊ हा तिकडं, जेवतो तुपाशी
चोराला मलिदा, अन् धन्याला धतुरा,
सवालाचा जबाब देर भाजपा सरकारा

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle