कामगारांच्या कष्टाने

kamagaramchya kashtane kamagaramchya kashtane kAmagArAMchyA kaShTAne | कामगारांच्या कष्टाने

कामगारांच्या कष्टाने, नटवलं जगाला
भाकर नाही पोटाला बाई, कपडा नाही नेसायला
शेतकऱ्यांच्या घामानं, जगाला जगवलं
लुटारू मक्तेदारानी बाई, आजवर त्यांना फसवलं
कष्टकऱ्यांना फसवुनी, रास धनाची जमवुनी
निवडणुकीला उधळून बाई, बसती सत्ता टिकवुनी
दुप्पट राबाया लावुनी, निम्मी मजुरी देऊनी
केली आमुची धुळदाण बाई, रगात आमच जाळुनी
देशाचं भगत म्हणत्यात, लोकाचं रगात पित्यात
मताला पाया पडत्यात बाई, मोर्चा बघून दडत्यातं
मंदी दुष्काळ सांगत्यातं, राबणाऱ्या जनतेला
पुढे करून या निमित्ताला बाई, चटावल फायद्याला
जनतेचे म्हणे हे कैवारी, जनता यांची ही न्यारी
बडे जमिनदार भांडवलदार बाई, मक्तेदार व्यापारी
एवढीच यांची जनता गं, त्यांचीच यांना चिंता गं
मूठभर जळवा जगवाया बाई, जाळती आमची चिता गं
हलकट हे सरकारं, मळकट सारा कारभार
दारूचा करतंय व्यापार बाई, खेळतय लॉटरी जुगार
घरामध्ये आता बसून गं, रडून नाही भागायचं
देऊन शिव्या सराप बोटं,़ मोडून नाही चालायचं
घरात भांडण काढ़ुनी, फुटकी भांडी फोड़ुनी
तुटकी बोलणी बोलून बाई, संपणार नाहीत गाऱ्हाणी
भिती मनातली झुगारुनी, उठा बाई पदर खोचुनी
एकजूट आपली उभारुनी बाई, दाही दिशा घुमवुनी
ही भांडवलशाही गाडू गं, लागल रगात सांडू गं
सोसून सारी संकट बाई, नवच राज्य मांडू गं
या राज्यामध्ये असल्या ह्या, भानगडी सतरा नसती गं
अधिकार मोठा राबणाऱ्यांना, नफ्याची जत्रा नसती गं
भिऊन जगायचा गेला काळ, पुकारतो ग झेंडा लाल
खूप सोसल आजवर बाई, उद्याची किरण लालीलाल

  • गुलाब नदाफ

Read more

एआयचे वस्तूपूजकत्व

एआयचे वस्तूपूजकत्व

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle
जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

मुख्य न्यायाधीशांच्या ‘कॉकरोच’ टिप्पणीपासून सुरू झालेली कॉकरोच जनता पक्षाची व्यंग्यात्मक चळवळ काही दिवसांतच कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली. या घडामोडींनी तरुणांमधील असंतोष, प्रसारमाध्यम स्वातंत्र्यावरील चिंता आणि भारतातील बदलत्या डिजिटल राजकारणाकडे लक्ष वेधले.

By Shubham Halle