वेणूबाय
venubaya venubaya veNUbAya | वेणूबाय
चला बाई चला एकजूट करा, स्त्री मुक्तीचा देऊ लढा
अगं वेणूबाय कशाला राहते दबून दबून चल मोर्चावरी
खाल्या लाथा आजवरी, गुलामगिरीत राहूनी
चल उठ आता, पुढे होऊ स्वत:, अगं वेणूबाय...
चुलीच्या दावणीला अडकुनी, जीवनाला बंधनं घालुनी
राहायचं नाही, डरायचं नाही, अगं वेणूबाय...
राजकारणात जाऊ या, लढून पुढाकार घेऊ या
पुरुषाची सत्ता, नको बाई आता, अगं वेणूबाय...
- श्रमिक संघटना