स्त्री मुक्तीची ही ललकारी

stri muktichi hi lalakari stri muktichi hi lalakari strI muktIchI hI lalakArI | स्त्री मुक्तीची ही ललकारी

स्त्री मुक्तीची ही ललकारी भिडते गगनाला
सनातन्यांनो पिळणाऱ्यांनो जाणा समयाला, स्त्री मुक्तीची...
पिता, पती अन् पुत्र लादती, इच्छा आपुली नारीवरती
समानतेचे हक्क मागता हसती तिच्या धैयाला, स्त्री मुक्तीची...
पंतप्रधान असो देशाची, अधिकारी अन् कुणी राज्याची
नारी तरीही अबला म्हणती, बांधती संसाराला, स्त्री मुक्तीची...
कारकून वा शेतमजूर ती, तज्ञ, सूज्ञ, शास्त्रज्ञ असो ती
घरामध्ये अन् कामावरती झटते जगण्याला, स्त्री मुक्तीची...
चला भगिनींनो जूट उभारु, समानतेची ध्वजा फडकवू
श्रमणाऱ्यांचा कोट बांधुनी मिळवू मुक्ती या, स्त्री मुक्तीची...

  • माधव चव्हाण

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle