तुम्हाला दु:ख कसं कळणार

tumhala dukha kasam kalanara tumhala dukha kasam kalanara tumhAlA du:kha kasaM kaLaNAra | तुम्हाला दु:ख कसं कळणार

तुम्हाला दु:ख कसं कळणार, अहो हे दु:ख कसं कळणार
रेशमच्या साडया नेसून, बंगल्यात तुम्ही राहणार
तुम्हाला दु:ख कसं कळणार...
पोर माझं फणफणे, डॉक्टर व्हंतय काय त्याला?
औषध देईन तीस रुपयं पडतील औषधाला
तीस रुपयं कुठून देणार, कुठून देणार?
तुम्हाला दु:ख कसं कळणार...
लाडकी ही मैनी म्हणे, आई घे ग मला रिबन
झगा आणि विमलसारखा,
पुढच्या महिन्यात तुला घेईन
पुढचा महिना कधी येणार, कधी येणार?
तुम्हाला दु:ख कसं कळणार...
पोर माझं साळंत जाई, फीची बाकी त्याच्या राही
मास्तरं म्हणं जारं पोरा, घरुन फी तू घेऊन येई
फी शिवाय साळंत नाही जाणार, पोर म्हणे साळंत नाही जाणार
तुम्हाला दु:ख कसं कळणार...
काल संपे गहू घरचा, आणि आज कोळसा बाई
एके दिवशी तांदूळ संपे, फोडणीला तेल नाही
वाणी म्हणे उधार नाही देणार, आता उधार नाही देणार
तुम्हाला दु:ख कसं कळणार...
घरोघरी माता किती, मनोमनी कुढताती
उमाळे नि कढ येती, आसू आणि दाटताती
आसूंचे या अंगार आता होणार
आसूंच्या या ठिणग्यांनी, वणवा पेटल चहूकडं
विषमतेची अन् जुलमाची, होईल होळी धडाधड
आता नवयुग जन्म घेणार, पोरंबाळं सुखी होणार

  • सुमन कात्रे (मेस्त्री)

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle