डोंगरी शेत माझं गं

domgari sheta majham gam domgari sheta majham gam DoMgarI sheta mAjhaM gaM | डोंगरी शेत माझं गं

डोंगरी शेत माझं गं मी बेनू किती
आलं वरीस राबून आम्ही मरावं किती
गवताचा भारा बाई गं घेऊन चढावं किती
आडाचं पानी बाई गं पानी वढावं किती
घरात तान्हा माझा गं तान्हा रडंल किती
तान्ह्याचं रडं ऐकून पान्हा येईल किती, डोंगरी शेत माझं गं...
आलं आलं वरीस जमीन नांगरून, उभं पीक नाचे सोन्यानं फुलून
परी एक मेला, सावकार ठोला, हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा
उपाशी राहून गं आम्ही मरावं किती, डोंगरी शेत माझं गं...
म्हागाईनं बाई घातला हैदोस, गळा आवळी बाई बेकारी फास
कुणाचं देऊ अन् कुणाचं ठेवू, कुणाचं देऊ अन् कुणाचं ठेवू
अशीच वर्सावर वर्स जातील किती, डोंगरी शेत माझं गं...

  • नारायण सुर्वे

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle