ताकद आपुली बळकट करुनी

takada apuli balakata karuni takada apuli balakata karuni tAkada ApulI baLakaTa karunI | ताकद आपुली बळकट करुनी

अहो ताकद आपुली बळकट करुनी
श्रमिकांसंगे जाऊ चला
मंत्र एक हा ध्यानी ठेवा, तोच मुक्तीचा मार्ग खरा, जीऽऽ जीऽऽ
अहो पायामधल्या बेडया होती, रूढी आणि परंपरा
जाती-धर्म करी बुध्दिभेद हो, मनुजाचा या पृथ्वीतला, जीऽऽ जीऽऽ
निसर्गे दिधला जन्म मानवा, नाही कल्पिला भेदाभेद
मनुष्य निर्मित भेदभाव करू, नष्ट घेऊनी अचूक वेध, जीऽऽ जीऽऽ
स्त्री-पुरुषांच्या समानतेचे, स्वप्न खरे करूया जगती
समाजसत्तावादासाठी टाकू पाऊल हे पुढती, जीऽऽ जीऽऽ
कष्टकऱ्यांच्या विविध चळवळी, एकजुटीमध्ये आणू चला
मानवमुक्तीसाठी लढण्या, एकजूट हा मार्ग खरा, जीऽऽ जीऽऽ
पददलितांची पिळवणुकीतून, मुक्ती व्हावी हा एकच ध्यास
मनी घेऊन जाऊ आपण, निर्मू आपुला नवा समाज, जीऽऽ जीऽऽ

  • शारदा साठे, ज्योति म्हापसेकर

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle