असं पत्रात लिवा

asam patrata liva asam patrata liva asaM patrAta livA | असं पत्रात लिवा

तुम्ही सुखात समदी ऱ्हावा, असं पत्रात लिवा
कोन्या मेल्यानं तुम्हा कळीवलं, मी ठ़ुमकते रस्त्यावर
संशय माझा आला तुम्हा तर, नाही जाणार बाहेर
पाणी आणायला जाऊ का नको, असं पत्रात लिवा
शंभर रुपयांचा हिसाब मागता, मीच का एकलीनं खाल्ले
लाईटीचे वीस दिले, पाण्याचे तीस दिले, पंचवीसचे राशन आणले
दुधवाल्याचे पंचवीस दिले, असं पत्रात लिवा
पयल्यांदा आला रिकाम्या हातानं फुक्कटं झाली खेप
बेबी झाली मोठी, तिला आवडते गाण्याची ऐकायला टेप
आमी सगळ्यांनी ऐकू का नकोग्न, असं पत्रात लिवा
बाळाला आला ताप आणि खोकला, प्रायव्हटेला घेऊन गेले
शंभर रुपयाचे इंजेक्शन मारले, पाण्यातच पैसे गेले
त्याला जे. जे. ला नेऊ का नको, असं पत्रात लिवा
नारी मुक्तीच्या भरतात सभा, मिटींगला आम्ही जातो
तुझ्या बहिणीला मारतो नवरा, सगळ्याजणी धमकावतो
तिला सोडवायला जाऊ का नको, असं पत्रात लिवा
बेबीला आताशी शाळेला घातलंय, अभ्यास चांगला करते
आयाबायांनी शिकायला पायजे, वस्तीच अख्खी बोलते
मी बी शिकायला जाऊ का नको, असं पत्रात लिवा
जवापासनं तुमी गेला परदेशी, माजलेत इथं लफंगे
मिळून मिसळून राह्याचं सोडून, धर्माच्या नावावर दंगे
समद्या वस्तीला समजावू का नको, असं पत्रात लिवा
कोन्या मेल्यानं तुमा कळीवलं मी ठ़ुमकते रस्त्यावर
मिटींगला जाते, मोच्र्याला जाते, त्याविना कसं जगणार?
या तुमीबी साथ द्यायला, असं पत्रात लिवा

  • मूळ हिंदी : शहनाज शेख व गीता महाजन
    स्वैर अनुवाद : नारायण सुर्वे

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle