संघटनेची ढाल एकीची तलवार

samghatanechi dhala ekichi talavara samghatanechi dhala ekichi talavara saMghaTanechI DhAla ekIchI talavAra | संघटनेची ढाल एकीची तलवार

संघटनेची ढाल एकीची तलवार हाती आमच्या आता हाय गं
कोरस : हाय गं, हाती आमच्या आता हाय गं
आम्ही कोणाला डरणार न्हाय गं, न्हाय गं
कोणाला डरणार न्हाय गं
धर्म आणि रूढी यांचा कोट त्यांनी बांधलाय
कोरस : बांधू द्या
गुलामगिरीचं जाळं त्यांनी टाकलंय
कोरस : टाकू द्या
बेगडी मुखवटयांना आता आम्ही फसणार न्हाय गं
कोरस : न्हाय गं, आम्ही फसणार न्हाय गं, आम्ही कोणाला डरणार न्हाय गं...
प्रेम, सेवा, त्याग यांची मूर्ती करून ते देव्हाऱ्यात ठेवती
कोरस : ठेवू द्या
दासी बटीक करून पायाखाली आम्हा तुडवती
कोरस : तुडवू द्या
आमचं माणूसपण सांगायला आता आम्ही जाणार हाय गं
कोरस : हाय गं, आता आम्ही जाणार न्हाय गं, आम्ही कोणाला डरणार न्हाय गं...
राबणाऱ्याचं गोत आम्ही लावणार
कोरस : आम्ही लावणार
श्रमिकांशी नातं आम्ही सांगणार
कोरस : आम्ही सांगणार
श्रमिकांच्या घालून हातात हात पुढंच जाणार हाय गं
कोरस : हाय गं, पुढंच जाणार हाय गं, आम्ही कोणाला डरणार न्हाय गं...
निर्मला साठे

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle