गमभन शिका
gamabhana shika gamabhana shika gamabhana shikA | गमभन शिका
रे रस्ते करणाऱ्यांनो, रे ओझी वाहणाऱ्यांनो
रे पिचून झिजणाऱ्यांनो, रे जोखड घेणाऱ्यांनो
ग म भ न शिका
ग म भ न शिका आणखी उचला पेन्सिल पाटी
शिका अक्षरे कशी करावी, शस्त्रे लढ़ण्यासाठी
ग म भ न शिका
शिका लिहाया वाचाया, श्रमिकांनो कष्टकऱ्यांनो
शिका लिहाया वाचायाला, उपाशी मरणाऱ्यांनो
नशिबाचा जर आज फैसला, तुम्ही करणार असाल
जर देशाच्या सत्तेवर कब्जा करणार असाल
ग म भ न शिका, ग म भ न शिका आणखी...
पूसा भटकती मजूरीसाठी, का श्रमिकांचे तांडे
पूसा सुक्या भाकरीवरी, का घेती झेप गिधाडे
पूसा मायबहिणींची अब्रू, बाजारी का विकते
पूसा श्रमाचे फळ तुमच्या, तोंडात कोणाच्या पडते
ग म भ न शिका, ग म भ न शिका आणखी...
वाचा! वाचा भिंतीवर लिहिलेले कष्टकऱ्यांचे नारे
वाचा पोस्टर काय म्हणे हे दोस्तच तुमचे सारे
वाचा वाहिल अंधश्रध्दामधून मुक्तीचे वारे
वाचा म्हणजे हर श्रमिकाला त्याचा हक्क मिळेल
आणिक इथले राज्य आपुल्या तंत्राने चालेल
ग म भ न शिका, ग म भ न शिका आणखी...