हाटीहाटीच्या आयाबायांनो
hatihatichya ayabayamno hatihatichya ayabayamno hATIhATIchyA AyAbAyAMno | हाटीहाटीच्या आयाबायांनो
हाटीहाटीच्या आयाबायांनो जागराला या या
शेतकऱ्यांनो कामकऱ्यांनो जागराला या या
वस्तीमधल्या भावाभैनींनो जागराला या या
गावामधल्या पोराबाळांनो जागराला या या
करणी भानामती, अहो भुतानं गिळल्या राती
गेलं अवचित घडून काही, कसं झालं समजलं नाही
आम्ही पाह्यलबी नाही - का नाही पाह्यलं?
आम्ही ऐकलंबी नाही - का नाही ऐकलं?
आम्ही पुसलं बी नाही - का नाही पुसलं?
माणूस म्हणूनी जन्म घेतला कशासाठी जगतात रं
दु:ख वाढतं तिथंच येई बुवाबाजीला माज रं
हे चालवून घ्यायाचं नाय रं
आता समजुन घ्यायाचं हाय रं
या जीवाचं मोल आज काय रं
आणि म्हणूनच
हाटीहाटीच्या आयाबायांनो जागराला या या...