धाड धिंग पाँग

dhada dhimga pa.nga dhada dhimga pa.nga dhADa dhiMga pA.Nga | धाड धिंग पाँग

धाड धिंग पाँग धाड धिंग पाँग
ढोल वाजतोय धाड धिंग पाँग
देवीच्या पोरी तालावर नाचती
ढोल वाजतोय धाड धिंग पाँग
देवीच्या नावानं बाजार भरलाय
ढोल वाजतोय धाड धिंग पाँग
डोक्यात खांडकं... यल्लम्मा
साप निघाला... यल्लम्मा
म्हैस मेली... यल्लम्मा
पोरगा हवा... यल्लम्मा
धाड धिंग पाँग धाड...
नोकरी गेली... यल्लम्मा
पोरगं मेलं... यल्लम्मा
विहीर आटली... यल्लम्मा
पीक जळलं... यल्लम्मा
आणि
चप्पल तुटली... यल्लम्मा
धाड धिंग पाँग...
आक्रीत घडलं दलिताघरी हो
देवी कोपली यल्लम्मा
गुरवानं हो उपाय दावला
लेक सोडली देवीला
केसामधी आली जट पोरीच्या
गुरवाची वाढली मालमत्ता
धाड धिंग पाँग...

  • सुकन्या आगाशे

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle