फुंकत घागर घुमते फिरते

phumkata ghagara ghumate phirate phumkata ghagara ghumate phirate phuMkata ghAgara ghumate phirate | फुंकत घागर घुमते फिरते

फुंकत घागर घुमते फिरते सांगे सखुबाई
देवी शिरली अंगात माझ्या म्हणते सखुबाई
प्रश्न विचारा उत्तर देते म्हणते सखुबाई
हुकूम सोडीत शिव्याही देते म्हणते सखुबाई
दु:ख ते सांगा इलाज करते म्हणते सखुबाई
इच्छा सांगा भविष्य सांगीन म्हणते सखुबाई
आगळी वेगळी भाषा मी बोलते म्हणते सखुबाई
घागर फुं$कत घुमते फिरते घुमते सखुबाई
सुदबुध हरते निपचित पडते थकुनी सखुबाई
उठते तेव्हा, देवी नसते बापुडी सखुबाई
सासू छळते आणि सोसते मुकाट सखुबाई
रोग मनाचा तुला ग जडला जडला सखुबाई

  • निर्मला साठे

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle