जंगल जळे, होळी खेळे

jamgala jale, holi khele jamgala jale, holi khele jaMgala jaLe, hoLI kheLe | जंगल जळे, होळी खेळे

जंगल जळे, होळी खेळे, मालदाराची पोरे बाळे
हिव्र्या रानाची, झाली तोडणी, ठेकेदाराघरी हत्ती झुले, जंगल जळे...
हिव्र्या रानाचा, श्वास कोंडतो, वाढती शहरे, धरणे, कारखाने
जंगलचा राजा, आदिवासी तो, उखडली त्याची पाळेमुळे, जंगल जळे...
चूल पेटते झाडोऱ्यावरी, गरिबाला हातकडी मिळे
ठेकेदार नेई जंगल चोरुनी, आधिकाऱ्या चिरीमिरी मिळे
जागे व्हा! जागे व्हा! जागे व्हा, जागे व्हा, रान वाचवा
हिव्र्या रानाचा जीव वाचवा
शेत फुलते, भूमी हासते, उभे पाठीशी जंगल जिथे
हिव्र्या रानाचा यजमानपणा, मेघराज येई पाहुणा तिथे, जंगल जळे...
तहानल्या भूमीला धाप लागते, पोटात तिच्या ना पाणी ठरते
रोडावे नदी, झरे आटती, छत डोईवर झाडं नाही ते
हिव्र्या रानाचा यजमानपणा, मेघराज येई पाहुणा तिथे, जंगल जळे...
जंगलचा ठेवा लुट़ून नेला, स्वार्थी धनिकांनी पैसा हो केला
दुष्काळ आमच्या पाठी लागला, वाळवंट आले गिळावयाला, जंगल जळे...
विज्ञान रोप ना लागले दारी, फळे गोमटी आम्ही भार वाही
इवलेसे रोप, लावा हो दारी, त्याचा वेलु जाय गगनावरी
जागे व्हा! जागे व्हा! जागे व्हा...

Read more

एआयचे वस्तूपूजकत्व

एआयचे वस्तूपूजकत्व

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle
जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

मुख्य न्यायाधीशांच्या ‘कॉकरोच’ टिप्पणीपासून सुरू झालेली कॉकरोच जनता पक्षाची व्यंग्यात्मक चळवळ काही दिवसांतच कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली. या घडामोडींनी तरुणांमधील असंतोष, प्रसारमाध्यम स्वातंत्र्यावरील चिंता आणि भारतातील बदलत्या डिजिटल राजकारणाकडे लक्ष वेधले.

By Shubham Halle