जंगले तोडली पाऊस गेला

jamgale todali pausa gela jamgale todali pausa gela jaMgale toDalI pAUsa gelA | जंगले तोडली पाऊस गेला

जंगले तोडली पाऊस गेला, वसाड झाली धरती
करा राज्य रे दगडावरती, करा राज्य रे वाळूवरती
कुठे ऊस होतो बेसुमार, कुठे पाण्याची मारामार
औषध खतांची तऱ्हा न्यारी, बी-बियाणांची चिंता भारी
आमचं व्हतं ते नव्हतं केलं, याचंच खरं म्हणा वरती, करा राज्य रे...
विकास आला घरोघरी, कारखान्यांची बघा गर्दी भारी
शुध्द हवेचा पत्ता नाही, अन् बिन विषाचं पाणी नाही
रांग लावूनी दवाखान्याला, जन्माची झाली माती, करा राज्य रे...
कुठे कशाची टाकी फुटली, त्यात पंचवीस पन्नास मेली
कुठे कशाची नळी फुटली, त्यात धा पाच हजार मेली
शास्त्र वापरून डोकं चालवून, विषच काहो काढती, करा राज्य रे...
अणुयुगाची सुरुवात झाली, कॉम्प्युटरांनी गर्दी केली
बेकारांच्यात भरती झाली, तारका युध्दाची भीती वाढली
घाण टाकुनी कचरा टाकुनी, जगाची कचरा पेटी, करा राज्य रे...
ते सारे सत्तेवर जाणार, आम्हीच हे सारं भोगणार
आता गप्प नाही बसणारं, ते सारं ताब्यात घेणार
जंगलं आमची जमीन आमची, आम्हीच ती राखणार
आम्हीच जंगलं राखणार, आम्हीच देश राखणार
आम्हीच जग राखणार, आम्हीच माणूस राखणार, करा राज्य रे...
धनाजी गुरव

Read more

एआयचे वस्तूपूजकत्व

एआयचे वस्तूपूजकत्व

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle
जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

मुख्य न्यायाधीशांच्या ‘कॉकरोच’ टिप्पणीपासून सुरू झालेली कॉकरोच जनता पक्षाची व्यंग्यात्मक चळवळ काही दिवसांतच कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली. या घडामोडींनी तरुणांमधील असंतोष, प्रसारमाध्यम स्वातंत्र्यावरील चिंता आणि भारतातील बदलत्या डिजिटल राजकारणाकडे लक्ष वेधले.

By Shubham Halle