पाऊस आला विज्ञान होऊन

pausa ala vijnana houna pausa ala vijnana houna pAUsa AlA vij~nAna hoUna | पाऊस आला विज्ञान होऊन

पाऊस आला विज्ञान होऊन
विज्ञान आले माणूस होऊन
आमच्या अडाणी कल्पना
वीज पडून खाक झाल्या
वादळ झाले खूप मोठे
छत्र्या आमच्या उडून गेल्या
भिजू आम्ही चिंब सारे
ज्ञानाच्या या पावसात
निळे रस्ते हिरव्या जमिनी
आकाशी हो प्रकाश पिवळा
नाही प्रदूषण नाही कुपोषण
पळून गेले रोग सगळे
अण्वस्त्रे ती विझून गेली
थिजून गेले त्यांचे मालक
युध्दाचे हो पाणी झाले
शक्ती झाली आमची इच्छा
आम्ही कोण काय पुसता
आम्हीच पाऊस आम्हीच ज्ञान
आम्हीच तुम्ही विज्ञानाचे
मालक आहोत खरेखुरे
वसली गावे आता आपली
आता उठून जायचे नाही
अकाल नाही दुष्काळ नाही
धूप नाही, धूर नाही
पाऊस आला खूप मोठा
पैसा त्यांचा झाला खोटा
मडके आमचे काठोकाठ
भरून आले, आला पूर
साठवू किती, ठेवू कुठे - मोहन देशपांडे

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle