ज्ञानसूर्याला ग्रहण लागलं

jnanasuryala grahana lagalam jnanasuryala grahana lagalam j~nAnasUryAlA grahaNa lAgalaM | ज्ञानसूर्याला ग्रहण लागलं

अहो, ज्ञानसूर्याला ग्रहण लागलं, अंधारलं जग सारं होऽऽ
तू जागा हो माणसा, जागा हो आणि उघड आपुलं डोळं रं, जी जी रं जी
ग्रहण लागलंय ग्रहण, ग्रहण लागलंय ग्रहण
अज्ञानाच्या समुद्रामध्दी बुडते जनता सारी हो
अन् विज्ञानाची नाव इवलीशी कुणाकुणाला तारी रं, जी जी रं जी, ग्रहण...
परग्रहावर पाऊल टाकून माणूस पोचे चंद्रावरी
अन्नावाचुनी वस्त्रावाचुनी मरते जनता सारी हो, जी जी रं जी, ग्रहण...
आंधळ्या विश्वासांच्या बेडया अडविति पाऊल लोकांचे
त्याच युगामधी पाऊल पडते चंद्रावर विज्ञानाचे, जी जी रं जी, ग्रहण...
विज्ञानाच्या नावेमध्ये कोण आज हे बसले हो
गरज आम्हाला कशाची आणि हेतू त्यांचे कुठले हो, जी जी रं जी, ग्रहण...
किती किती आम्ही वाट पहावी, ग्रहण हे सुटण्याची हो
विज्ञानाच्या नावेमधले, सुकाणू घेऊ हातामधी, जी जी रं जी, ग्रहण...
विज्ञानाची चळवळ बनवू, अंधार हटण्यासाठी हो
तिसरा डोळा ज्ञानाचा तो, उघडू उद्याच्यासाठी हो, जी जी रं जी, ग्रहण...
विज्ञानाला राबवू या मग, लोकहिताच्यासाठी हो
विज्ञानाचे कामच बनवू, मानवमुक्तीसाठी हो, जी जी रं जी, ग्रहण...
विज्ञानाचा प्रकाश फिरू दे, घराघरामधी लोकांच्या
आणि पेटवा मशाली तुम्ही, आता जन जागराच्या
अन् मगं?... सुटंल ग्रहण सुटंल, सुटंल ग्रहण सुटंल

Read more

एआयचे वस्तूपूजकत्व

एआयचे वस्तूपूजकत्व

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle
जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

जेव्हा व्यंग्याने सत्तेला हादरा दिला: कॉकरोच जनता पक्षाचा उदय

मुख्य न्यायाधीशांच्या ‘कॉकरोच’ टिप्पणीपासून सुरू झालेली कॉकरोच जनता पक्षाची व्यंग्यात्मक चळवळ काही दिवसांतच कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली. या घडामोडींनी तरुणांमधील असंतोष, प्रसारमाध्यम स्वातंत्र्यावरील चिंता आणि भारतातील बदलत्या डिजिटल राजकारणाकडे लक्ष वेधले.

By Shubham Halle