महाराष्ट्राच्या शूरविरांनो

maharashtrachya shuraviramno maharashtrachya shuraviramno mahArAShTrAchyA shUravirAMno | महाराष्ट्राच्या शूरविरांनो

या देशासाठी रणभूमीवर प्राण जयांनी वाहिला
महाराष्ट्राच्या शूरविरांनो तुम्हालाच पहिला, हा घ्या मानाचा मुजरा
भरे कापरे शत्रू हादरे, धाक असे शिवरायांचा
तसेच बाजी वीर तानाजी, धनाजी अन संताजीचा
त्या शूरविरांनी झेंडा तयांनी, अटकेपार रोविला, महाराष्ट्राच्या...
जिवात जीव असेतो लढली, मर्दानी झाशीवाली
वासुदेव अन् मंगल पांडे, यांनी प्राणाची आहूती दिली
देशासाठी तात्या टोपेंनी, फास गळा अडकाविला, महाराष्ट्राच्या...
मधु चौधरीच्या डोक्याचे, रजरज केले मेंदूचे
मोटारीसह ओढीत नेले, प्रेत रामगिरी साधूचे
हिरवे गुरुजी, नथू कांबळे, यांनी प्राणदंड साहीला, महाराष्ट्राच्या...
इंग्रजांशी हक्कासाठी, अनंत कान्हेरे लढला
तो दामोदर, हरी चाफेकर, हाय मृत्यूमुखी पडला
चिरडला गेला बाबू गेनू, उभा रक्ताने वाहीला, महाराष्ट्राच्या...
घाडीगावकर, बंडू गोखले, मुंबईसाठी बळी पडले
गोलतकर अन् शरदवाणी हे, बालवीर ही रणी पडले
कवन करुनी जगदीशाने मुजरा तयांना वाहीला, महाराष्ट्राच्या...

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle