सुटला वादळी वारा, वल्हव जोमानं मारा

sutala vadali vara, valhava jomanam mara sutala vadali vara, valhava jomanam mara suTalA vAdaLI vArA, valhava jomAnaM mArA | सुटला वादळी वारा, वल्हव जोमानं मारा

सुटला वादळी वारा, वल्हव जोमानं मारा
चला गाठू किनारा, गाठू किनारा, गाठू किनारा रे
उजविला महागाई, बेकारी खडक, बसल धडक
हेरून ठेव हा माराया धडक, फोडाया खडक
निकडंवि पाऊस नि गारा, जनु मशीनगनचाच मारा, चला गाठू किनारा...
मोठया मोठया लाटांची भिती कुनाला आम्हाला कोल्याला
छातीवर नाचाया जल्याला आला, भेतोय कां त्याला
डोंगूर लाटांचा समुरनं आला, तुडवून त्येला
एकीचा करून पुकारा, वल्हं डावीला नेटान मारा, चला गाठू किनारा...
किनारा गाठूच घाई नको रं, धीरान घ्या रं
दर्यात हिंमतीनं डोली टाका रं, म्हावर धरा रं
म्हावऱ्यासाठी नाव लोटलिया ना रं, काळाच्या म्होरं
मग काळावरी चाल करा अन भरभर म्हावरंबी धरा, चला गाठू किनारा...
म्हावऱ्याइना कोली जगनार नाई, इलाज नाई
कसला किनारा रं पोटात नाई, करू लढाई
आपल्यातनं पडत्याल लढताना काई, पर्वाबी नाई
झेंडा रक्ताच्या त्येचाच उभारा
शीड त्येस्नीच समरुन हाकारा
मग तुफान लाटा नि गारा
त्याचं आपसुक होत्याल निवारा झुंजू गाठू किनारा रे, चला गाठू किनारा...

  • शाहीर अमर शेख

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle