सुटलाय धोटा साच्यावरून

sutalaya dhota sachyavaruna sutalaya dhota sachyavaruna suTalAya dhoTA sAchyAvarUna | सुटलाय धोटा साच्यावरून

सुटलाय धोटा साच्यावरून, साचा बंद, साचा बंद करून
धोटं समदं घेऊन, रस्त्यात आला लढा लढायला
त्या अडवायला छाती असल तर या...
काँग्रेस सरकार धन्याची जात, ऐटीत घालून हातात हात
मधून येती कराया घात, सत्तेची बंदूक नेहमीची बात
म्हनं देऊनी भाकरी, पडलं ती चाकरी, नाहीतर ठोकरी
माराया येताय का या...
त्वेषानं चिडून आलो रणात, निसतीच भाकरी नाही मनात
कारभार समदा घ्यावा हातात, धनिकशाहीचं पाडून दात
तूर्ताला ठरलं, हत्यार धरलं, रणी उतरलं
अडवाया येणार या...
धोटा, बॉबिन, बांबू, रहाट, खांद्याला खांदा हातात हात
मैदानी आलो एका दमात, माघार नाही एकच बात
बाना झोडायला, एकी तोडायला, गोळ्या झाडायला
छाती असलं तर या...
बि.आय.आर. कायद्याचा वापर करून
मालक बोका बसलाय माजून
संघाचा चमचा हातात घेऊन
कामगार वर्गाच रक्त पिऊन
याचा बदला घेणार, संघ ठेचून काढणार, बि.आय.आर.
कायदा तोडणार अडवाया येणार या...

  • शाहीर अमरशेख

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle