बिजली नाचेल गगनात

bijali nachela gaganata bijali nachela gaganata bijalI nAchela gaganAta | बिजली नाचेल गगनात

बिजली नाचेल गगनात, वादळ होईल जोसात
जंगल जळेल वणव्यात, मंगल होईल देशात
बिजली कडाड गर्जेल, पाऊस धडाड येईल
पाणी चढेल शहरात, पाणी जिरेल शेतात
बिजली वरून कोसळते, सावध हवेली ढासळते
जाईल हवेली मातीत, घरटं राहील शाबूत
बिजली कुणाला जाळील, बिजली कुणाला उजवील
बिजली येईल अवचीत, न्याय करील जगतात
बिजली कुठून येईल, वादळ कुठून होईल
शेतकंऱ्यांच्या शेतामधुनी, औतं फिरती, जमीन खणती
लाख ऐरणी घण खणखणती, घरात घरघर जाती फिरतीग्न
भिंती लिंपिती, मळे शिंपिती, विळे चालती, विटा भाजती
पाठीवरुनी पाट वाहती, कैक करवती कुरकुर करती
मडकी घडती, चिखल तुडविती, कोणी विणती सारे कण्हतीग्न
या औतातून, हातोडयातून, या जात्यातून या पात्यातून
या भात्यातून, या दात्यांतून, या कामातून या घामातून
या भात्यातून, या दात्यांतून, या कामातून या घामातून
या अश्रूंतून या अग्नीतून
ठिणगी फुटेल जोसात, येईल विजेच्या वेषात
बिजली नाचेल गगनात, वादळ होईल जोसात

  • वसंत बापट

Read more

एआयचा बाजार

एआयचा बाजार

या लेखात एआयच्या वाढीमागील मक्तेदारी भांडवल, व्यापक निरीक्षण, श्रमशोषण आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण केले आहे. केट क्रॉफर्ड आणि मार्क्सवादी दृष्टिकोनाच्या आधारे लेखक एआयवरील सामाजिक नियंत्रण आणि लोककेंद्रित विकासाची गरज अधोरेखित करतो.

By Shubham Halle
युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

युद्ध, भारतीय राज्य आणि कामगार नागरिक

या लेखात भारतातील कामगार वर्गाची स्थिती, कंत्राटी कामगारांच्या वाढत्या संपांची लाट आणि नव्या कामगार धोरणांमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा आढावा घेतला आहे. तसेच पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय कामगार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही अधोरेखित केला आहे.

By Shubham Halle
भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शाळा संकटात: शाळाबंदी, गळती आणि ढासळणारी पायाभूत सुविधा

भारतातील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला शाळाबंदी, वाढती विद्यार्थी गळती, अपुरी पायाभूत सुविधा आणि शिकण्याच्या निकृष्ट परिणामांचे गंभीर आव्हान आहे. विविध अहवालांनुसार लाखो मुले शिक्षणाबाहेर आहेत आणि अनेक शाळांमध्ये वीज, पाणी, इंटरनेट, प्रयोगशाळा व सुरक्षित इमारतींचा अभाव आहे.

By Shubham Halle