जाती घडी पुना येणार नाय रं
jati ghadi puna yenara naya ram jati ghadi puna yenara naya ram jAtI ghaDI punA yeNAra nAya raM | जाती घडी पुना येणार नाय रं
ओऽऽऽ ओऽऽऽ ओऽऽऽ ओऽऽऽ
जाती घडी पुना येणार नाय रं
घुसून चला पुढं जाऊं रं
गेलं तुफान तसं आलं उधान
आता माघार घेयाची नाय रं, नाय रं, जाती घडी...
तुफान दर्या उफाळला
भेती कुनाची सांगा मला
कोळ्याचं प्वार कधी भेतय त्याला
डावपेच खेलायचे दिवसबी गेले
समुर समुर आता जाऊं रं, जाऊं रं, जाती घडी...
गावलं आमाला जालंबी लाल
गडया उगवला ताराबी लाल
करू कमाल आमी कोळ्याचं जाल
मोट्टं मोट्टं मासं आलं धारीला
चौकून घेरायचं हाय रं, हाय रं, जाती घडी...
बोयर मासा आला घेरा
नोकरशहा ह्यो बगा जरा
एकीचं जालं जरा हुशार धरा
बावटयाची निशानी होताच समदं
तुट़ून पडायचं हाय रं, हाय रं, जाती घडी...
सावकारशाहीचा पापलेट आला
दयामाया न्हाई घाला घाला
एकीच्या डोलीत पगवा याला
बारिक बारिक मासं खाऊनं मातला
पालि आता याचि हाय रं, हाय रं, जाती घडी...
गावचा गटार मासा आला
काळा बाजार ज्यानं चिकार केला
काढून वाळूवर फेका त्याला
साधंसुधं म्हावरं नको आमाला
चांगलं चुंगलं आता खाव रं
जनतेच्या क्रांतीचं उधान आलं
बावटयानं एकीचं जाळं दिलं
मदतीला लाल झंडेवालं आलं
(लाल) बावटयाला खांद्यावर घेऊन आता
चोरान्सि झोडायचं हाय रं
- शा. अमर शेख