स्वराज्य जननी जिजाऊ माय, स्वातंत्र्य समतेचा जयघोष शिवराय!
Swarajya janani jijau shivray
स्वराज्यजननी जिजाऊ माय, स्वातंत्र्य समतेचा जयघोष शिवराय
अन्यायाशी कसं भिडायचं हाय,
सांगती आम्हां जिजाऊ शिवराय
आता साऱ्यांना गर्जून हे सांगायचं हाय...
तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय!
वतनदार किती लुटती रयतेला, घोडं जाती तुडवीत उभ्या पिकाला
तवा रयतेला मायेने धरले पोटाशी, जुल्मी वतनदारा गाडले मातीशी
अशा स्वराज्याचे बीज रुजवायचं हाय.....
तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय!
बाई गुलामीच्या कोंडीत होती तिच्या अब्रूची लक्तरे तोडीत होती
अशा रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा केला न्यायाचा दिवा इथं त्यांनी लावला
अशी न्यायाची ज्योत पुन्हा पेटवायची हाय.....
तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय!
जातीभेदाची भिंत फोडली अंधश्रद्धेची बेडी तोडली धर्माधर्माला त्यांनी प्रेमाने जोडले
माणुसकी ध्वजाला उंच फडकवले आता भेदभाव इथला हा संपवायचा हाय....
तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय!